A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मी मज हरपुन बसले ग

मी मज हरपुन बसले, ग

आज पहाटे श्रीरंगाने मजला पुरते लुटले, ग
साखरझोपेमध्येच अलगद प्राजक्तासम टिपले, ग

त्या श्वासांनी दीपकळीगत पळभर मी थरथरले, ग
त्या स्पर्शाच्या हिंदोळ्यावर लाजत उमलत झुलले, ग

त्या नभश्यामल मिठीत नकळत बिजलीसम लखलखले, ग
दिसला मग तो देवकिनंदन अन्‌ मी डोळे मिटले, ग
हिंदोल (हिंडोल) - झुला, झोका.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.