मी पाहिले कितीदा
मी पाहिले कितीदा तीरावरी बसून
ते दृश्य ओळखीचे का वाटते नवीन
तू संगती म्हणून..
मी पाहिले कितीदा तीरावरी बसून..
मज एकटीस होती ही सांजवेळ म्लान
परि आज होत आहे छायेत लीन ऊन
तू संगती म्हणून..
मी पाहिले कितीदा तीरावरी बसून..
जो कलकलाट होता मी झाकलेच कान
ते शब्द पांखराचें झाले समूहगान
तू संगती म्हणून..
मी पाहिले कितीदा तीरावरी बसून..
परतून जातसे मी वार्यास ह्या विटून
तो मंद सांजवारा दे शिरशिरी भरून
सारेच काव्य झाले आलास तू म्हणून
बोलास फूल आले तू संगती म्हणून
तू संगती म्हणून..
मी पाहिले कितीदा तीरावरी बसून..
ते दृश्य ओळखीचे का वाटते नवीन
तू संगती म्हणून..
मी पाहिले कितीदा तीरावरी बसून..
मज एकटीस होती ही सांजवेळ म्लान
परि आज होत आहे छायेत लीन ऊन
तू संगती म्हणून..
मी पाहिले कितीदा तीरावरी बसून..
जो कलकलाट होता मी झाकलेच कान
ते शब्द पांखराचें झाले समूहगान
तू संगती म्हणून..
मी पाहिले कितीदा तीरावरी बसून..
परतून जातसे मी वार्यास ह्या विटून
तो मंद सांजवारा दे शिरशिरी भरून
सारेच काव्य झाले आलास तू म्हणून
बोलास फूल आले तू संगती म्हणून
तू संगती म्हणून..
मी पाहिले कितीदा तीरावरी बसून..
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | श्रीधर फडके |
स्वर | - | उत्तरा केळकर, श्रीकांत पारगांवकर |
गीत प्रकार | - | भावगीत, युगुलगीत |