A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मी राधा मीच कृष्ण

मी राधा मीच कृष्ण एकरूप झाले

मी गोकूळ मी यमुना
मीच गोप व्रज-ललना
जसुमती मी, मीच नंद वैर ते निमाले

नव विकसीत कमल मीच
पुष्पगंध मी विमल मीच
मीच पवन उपवनीं जो मंद मंद चाले

मी मधुवन मी मुरली
कुंजवनी जी भरली
एकातुनी मी अनेक वेष नटुनी आले
उपवन - बाग, उद्यान.
विमल - स्वच्छ / निर्मल / पवित्र / पांढरा / सुंदर.