A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मीलनास आपुल्या साक्ष धवल

मीलनास आपुल्या साक्ष धवल चंद्रकोर
अक्षता अन्‌ मंत्र नको, नको साक्षी सनईसूर

का असे न ऋतू वसंत, मन कोकिळ गाई गीत
रातकिडा देई साथ छेडुनिया एक सूर

धुंद गंध दरवळला लतामंडपी सगळ्या
भूषविते अधिक त्यास पुष्पशेज नक्षीदार

येई सखे, ये समीप, नभ उजळीती लक्ष दीप
देहलता तव कापे स्पर्शताच पवन गार
गीत - गंगाधर दांडेकर
संगीत - प्रभाकर पंडित
स्वर- स्‍नेहल भाटकर
गीत प्रकार - शब्दशारदेचे चांदणे, भावगीत
  
टीप -
• 'गीत शाकुंतल' या रंगमंचीय कार्यक्रमातून.
शेज - अंथरूण.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.