A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मिटुनी लोचने घे

मिटुनी लोचने घे भिरभिरती
सूर नांदीचे बघ दरवळती
लालचुटुक मखमली आता
अलगद ही उमलेल
भारुनिया अवकाशच अवघा
खेळ नवा रंगेल..

नवीन नांदी नवी संहिता
हवीहवीशी नवी भूमिका
पात्र होऊनि विरघळताना
गात्र गात्र बहरेल
भारुनिया अवकाशच अवघा
खेळ नवा रंगेल..

प्रवेश सरला, अंक बदलला
अंधारातच मंच मिळाला
पुन्हा तुझ्यास्तव याच तमांतून
नवा मंच उजळेल..
गीत - गुरु ठाकूर
संगीत - अजित परब
स्वर- विजय प्रकाश
चित्रपट - नटसम्राट
गीत प्रकार - चित्रगीत
गात्र - शरीराचा अवयव.
तम - अंधकार.