मोगरा फुलेतो थांब
जिवलगा, थांब
मोगरा फुलेतो थांब
उद्या पाकळ्या सार्या फुलतील
साद जीवाला सुगंध घालील
डोळे उघडुनी अंगण पाहील
मधुमास हसेतो थांब
पानांआडुनी गाई कोकिळा
तप्त नभाचा उर गहिवरला
माझ्याही उरी काटा फुलला
कोकिळा गाईतो थांब
मध्यरात्रीचे मदिर चांदणे
स्पर्शुनी करिते जादूटोणे
जीव घाबरे हा स्वप्नाने
चंद्रमा बुडेतो थांब
प्रवास अवघड, पंथ दूरचा
अरुण उद्याचा लोळ अग्नीचा
क्षण कुसुमित कर विश्रांतीचा
ये, घाम पुसेतो थांब
मोगरा फुलेतो थांब
उद्या पाकळ्या सार्या फुलतील
साद जीवाला सुगंध घालील
डोळे उघडुनी अंगण पाहील
मधुमास हसेतो थांब
पानांआडुनी गाई कोकिळा
तप्त नभाचा उर गहिवरला
माझ्याही उरी काटा फुलला
कोकिळा गाईतो थांब
मध्यरात्रीचे मदिर चांदणे
स्पर्शुनी करिते जादूटोणे
जीव घाबरे हा स्वप्नाने
चंद्रमा बुडेतो थांब
प्रवास अवघड, पंथ दूरचा
अरुण उद्याचा लोळ अग्नीचा
क्षण कुसुमित कर विश्रांतीचा
ये, घाम पुसेतो थांब
गीत | - | वा. रा. कांत |
संगीत | - | |
स्वर | - | पुष्पा मराठे |
गीत प्रकार | - | भावगीत |
कुसुमित | - | सुगंधित. |
मदिर | - | धुंद करणारा. |