A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ना ना ना नाही नाही

ना ना ना ना नाही नाही नाही ग!
आता पुन्हा मजसि येणे नाही ग!

घन भरुन भरुन झरे गगन वरुन
कुणि साजण दुरुन मज दिसे कि हसे
खुणवि सये बाइ ग!
ना ना ना ना नाही नाही नाही ग!

बोलति चुडे किण किण किण, कलशि जल गाते ग!
नूपुर बोले छुन छुन छुन, पाऊल पुढे जाते ग!
नवल घडे अहा अहा अहा
हृदय धडधडे कि उडे पदर सये बाइ ग!
ना ना ना ना नाही नाही नाही ग!

गहन वन झाले ग शीतल वारा
भिजलि तनु सारी ग झेलून धारा
पवन वाजे सण सण सण, वेढुन मज घेतो ग
भ्रमर बोले गुण गुण गुण, साजण साद देतो ग!
नयन झरे अहा अहा अहा
अधर थरथरे कि झुरे आतुर मन बाइ ग!
ना ना ना ना नाही नाही नाही ग!

नाही सुचत काम, नाही रुचत धाम
मनमोहन श्याम मज दिसे कि हसे
सजण ठायि ठायि ग!
ना ना ना ना नाही नाही नाही ग!
ठाय - स्थान, ठिकाण.