A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सगुण निर्गुण दोन्ही

सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ॥१॥

पतितपावन मानसमोहन । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ॥२॥

ध्येय ध्याता ध्यान चित्त निरंजन । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ॥३॥

ज्ञानदेव ह्मणे आनंद चिद्घन । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ॥४॥