नाम विठोबाचें घ्यावें
नाम विठोबाचें घ्यावें ।
मग पाऊल टाकावें ॥१॥
नाम तारक हें थोर ।
नामें तरिले अपार ॥२॥
अजामेळ उद्धरिला ।
चोखामेळा मुक्तीस नेला ॥३॥
नाम दळणीं कांडणीं ।
ह्मणे नामयाची जनी ॥४॥
मग पाऊल टाकावें ॥१॥
नाम तारक हें थोर ।
नामें तरिले अपार ॥२॥
अजामेळ उद्धरिला ।
चोखामेळा मुक्तीस नेला ॥३॥
नाम दळणीं कांडणीं ।
ह्मणे नामयाची जनी ॥४॥
| गीत | - | संत जनाबाई |
| संगीत | - | यशवंत देव |
| स्वर | - | आशा भोसले |
| गीत प्रकार | - | संतवाणी, विठ्ठल विठ्ठल |
| अजामेळ | - | ही कथा भागवत पुराणातली आहे. अजामेळ नावाचा एक पापी होऊन गेला. तो कधीच सत्कर्मात रमत नसे. पण त्याने त्याच्या मुलाचे नाव नारायण ठेवले होते. अंतसमयी मुलास हाक मारताना त्याच्याकडून हरीनामाचा जप झाला आणि उपरती होऊन त्यास सद्गती मिळाली. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












आशा भोसले