नाव तिकडचं घेऊ ग
नाव तिकडचं घेऊ ग कसं बाई?
रूपगुणाला अचुक जुळेसं बाई !
नयनी जयांच्या रात चांदणी
मोत्यांची वदनात मांडणी
वचनी गोडशी चतुर लावणी
लहान-थोरां लावी पिसं ग बाई
भाग्यवंत सखी हात तिकडचा
शिवता मधुरस होई जलाचा
मातीला ये कस सोन्याचा
स्पर्षे ज्यांच्या स्वर्ग दिसं ग बाई
हृदय जयांचे पुण्यशील अति
इंद्रनीळ गगनाची कांती
कुळशीळाची पावन कीर्ती
गंगेचे जणू मूळ जसं बाई
दसलाखांचे नाव तयांचे
गाव गाव सखी गाजायाचे
सौख्य मलाही ते घ्यायाचे
परि सखे, सुचेना घेऊ कसं ग बाई
रूपगुणाला अचुक जुळेसं बाई !
नयनी जयांच्या रात चांदणी
मोत्यांची वदनात मांडणी
वचनी गोडशी चतुर लावणी
लहान-थोरां लावी पिसं ग बाई
भाग्यवंत सखी हात तिकडचा
शिवता मधुरस होई जलाचा
मातीला ये कस सोन्याचा
स्पर्षे ज्यांच्या स्वर्ग दिसं ग बाई
हृदय जयांचे पुण्यशील अति
इंद्रनीळ गगनाची कांती
कुळशीळाची पावन कीर्ती
गंगेचे जणू मूळ जसं बाई
दसलाखांचे नाव तयांचे
गाव गाव सखी गाजायाचे
सौख्य मलाही ते घ्यायाचे
परि सखे, सुचेना घेऊ कसं ग बाई
गीत | - | बा. भ. बोरकर |
संगीत | - | जी. एन्. जोशी |
स्वर | - | कांचनमाला शिरोडकर-बढे |
गीत प्रकार | - | भावगीत |
पिसे | - | वेड. |