पतंगा जशी ओढ
पतंगा जशी ओढ ज्योतीकडे
तशी प्रीत माझी तुझ्याशी जडे
जशी धाव घेते नदी सिंधुपाशी
तसे वेड तुझे मनाला जडे
इथे कंटकांनी मला वेढिली
तुला गंधवार्ताही ना लाभली
न साही जीवा भार या सौरभाचा
कधी भृंग धावेल माझ्याकडे?
सदा भास वेडावतो गे तुझा
अशी का दुरुनीच देशी सजा
इथे कंकणांचा, इथे पल्लवांचा
करी सुन्न कल्लोळ चोहीकडे
तशी प्रीत माझी तुझ्याशी जडे
जशी धाव घेते नदी सिंधुपाशी
तसे वेड तुझे मनाला जडे
इथे कंटकांनी मला वेढिली
तुला गंधवार्ताही ना लाभली
न साही जीवा भार या सौरभाचा
कधी भृंग धावेल माझ्याकडे?
सदा भास वेडावतो गे तुझा
अशी का दुरुनीच देशी सजा
इथे कंकणांचा, इथे पल्लवांचा
करी सुन्न कल्लोळ चोहीकडे
| गीत | - | यशवंत देव |
| संगीत | - | यशवंत देव |
| स्वर | - | दशरथ पुजारी, प्रमिला दातार |
| गीत प्रकार | - | युगुलगीत, भावगीत |
| कंटक | - | काटा. |
| सिंधु | - | समुद्र. |
| सौरभ | - | सुगंध / कीर्ती. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












दशरथ पुजारी, प्रमिला दातार