A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नाच हृदया आनंदे

नाच हृदया आनंदे । मिरवित अपुले भाग्य हे ॥
शुभदिन मंगल हा ।

उधळित आला । अमर सुखाला ।
दशदिशा अहा फुलल्या ॥

उडूनिया देव लोकी । जाउनी सांग सकलांना
भाग्यवंत जगि आज कोण मज ऐशी ।
सांगा । त्रिभुवनि देवा ॥