A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नच सुंदरि करूं कोपा

नच सुंदरि करूं कोपा ।
मजवरि धरि अनुकंपा ।
रागानें तव तनु ही पावत कशि कंपा ॥

नारी मज बहु असती ।
परि प्रीती तुजवरतीं ।
जाणसि हें तूं चित्तीं ।
मग कां ही अशि रीती ।
करिं मी कोठें वसती ।
तरि तव मूर्ती दिसती ।
प्रेमा तो मजवरिचा नेऊं नको लोपा ॥

करपाशीं या तनुला ।
बांधुनि करि शिक्षेला ।
धरुनीयां केशांला ।
दंतव्रण करि गाला ।
कुचभल्ली वक्षाला ।
टोंचुनि दुखवीं मजला ।
हाचि दंड योग्य असे सखये मत्पापा ॥
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वराविष्कार- छोटा गंधर्व
खाँसाहेब अब्दुल करीम खाँ
अजितकुमार कडकडे
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - सौभद्र
राग - पिलू
ताल-दादरा
चाल-बिडोरंगा ह्यरळू या कर्नाटकी चालीवर.
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• बिडोरंगा ह्यरळू या कर्नाटकी चालीवर, ताल- दादरा
नच सुंदरि करूं कोपा.. नेऊं नको लोप

• राग व ताल सदर
करपाशीं या तनुला.. सखये मत्पापा

कुच - स्‍त्रीचे स्तन / स्तनाग्रे.
भल्ल - भाल्याचे अथवा बाणाचे टोक.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  छोटा गंधर्व
  खाँसाहेब अब्दुल करीम खाँ
  अजितकुमार कडकडे