A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नाचती ओठावरी हे

नाचती ओठावरी हे बोल वेड्या प्रीतिचे
ऐकुनी घेणे न घेणे, ते तुझ्या स्वाधीनचे

प्रेम माझे का कसे हे मी किती वर्णायचे
प्रेम तू दावी न दावी, ते तुझ्या स्वाधीनचे

प्राणपुष्पांचाहि झेला मी तुझ्या हाती दिला
झेलणे लाथाडणे वा, ते तुझ्या स्वाधीनचे

गुंगलेल्या या जिवाला प्रीतिचे गाणे रुचे
साथ देणे की न देणे, ते तुझ्या स्वाधीनचे