A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नदीच्यापल्याड आईचा

नदीच्यापल्याड आईचा डोंगुर
डोंगरमाथ्याला देवीचं मंदिर
घालु जागर जागर डोंगरमाथ्याला

घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून डोंगर येंगून, उघड देवी दार

नदीच्या पाण्यावर आगीनं फुलतं
तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं
नाद आला ग आला ग जिवाच्या घुंगराला

घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून डोंगर येंगून, उघड देवी दार

नवसाला पाव तू, देवी माझ्या हाकेला धाव तू
हाकेला धाव तू, देवी माझ्या अंतरी र्‍हाव तू
देवी माझ्या अंतरी र्‍हाव तू, काम-क्रोध परतुनी लाव तू
काम-क्रोध परतुनी लाव तू, देवी माझी पार कर नाव तू

डोळा भरून तुझी मुरत पाहीन
मुरत पाहीन, तुझा महिमा गाईन
महिमा गाईन, तुला घुगर्‍या वाहीन
घुगर्‍या वाहीन, तुझा भंडारा खाईन
दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला

घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून डोंगर येंगून, उघड देवी दार

यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर
निवदाची भाकर दाविती ही जमल्या ग लेकरं
पुनवंचा चांदवा देवीचा ग मायेचा पाझर
आई तुझा मायेचा पाझर, जागर ह्यो भक्तीचा सागर

खणा-नारळानं ओटी मी भरीन
ओटी मी भरीन, तुझी सेवा करीन
सेवा करीन, तुझा देव्हारा धरीन
देव्हारा धरीन, माझी ओंजळ भरीन
आई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला

घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून डोंगर येंगून, उघड देवी दार

यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर
निवदाची भाकर दाविती ही जमल्या ग लेकरं
पुनवंचा चांदवा देवीचा ग मायेचा पाझर
आई तुझा मायेचा पाझर, जागर ह्यो भक्तीचा सागर