A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नदीकिनारी नदीकिनारी (२)

नदीकिनारी नदीकिनारी नदीकिनारी, ग!

इथेच घडली भेट आपुली
नवप्रेमाची पहिलीवहिली
हासत होत्या कुजबुजुनी या अवखळ लहरी, ग!

तुझेच कुरळे केस मोकळे
सदा तयाशी करुनी चाळे
वहात होता लबाड वारा पदरामधुनी, ग!

निळ्या नभांतुनी येउनि खाली
ऐकत होती रात्र रुपेरी
निर्मळशी अपुल्या प्रीतीची गोड कहाणी, ग!

निवांत झाले आज चहुकडे
उभारले प्रीतीचे थडगे
रात्र ढाळिते रोज प्रभाती अश्रुफुले वरती, ग!

 

  ज्योत्‍स्‍ना भोळे