A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नगरी नगरी ही सौंदर्याची

नगरी.. नगरी ही सौंदर्याची खाण

कुणी पद्मिनी कुणी चित्रिणी
मीनाक्षी कुणी हरिणाक्षी कुणी
त्यातिल दो नयनांचे मजवरि झाले शरसंधान

सुंदरतेच्या कथाहि सुंदर
सुंदरतेच्या व्यथाहि सुंदर
सुंदर या हृदयी रुतलेला सुंदर तोहि बाण

जिकडेतिकडे सुंदर सुंदर
त्यातच मीही झालो सुंदर
खरोखरी परमेश्वर सुंदर, त्याचे हे वरदान