A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नाहीं झाले षण्मास मला

नाहीं झाले षण्मास मला राज्य सोडुनी ।
तोंच विपरित हें काय ऐकण्यांत ये जनीं ॥

काय माझा तो भाग अंधपुत्र सेवितो ।
काय देवकिचा तनय कृष्ण वचन मोडितो ।
काय हलधर नवरत्‍न मर्कटासि अर्पितो ।
नवल हेंचि मन्मनीं ॥