A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नाहीं कशी म्हणूं तुला

नाहीं कशी म्हणूं तुला, म्हणतें रे गीत;
परि सारें हलक्यानें : आड येते रीत.

नाहीं कशी म्हणूं तुला.. येतें, जरा थांब;
परि हिर्व्या वळणांनी जायचें न लांब.

नाहीं कशी म्हणूं तुला, माळ मला वेणी;
परि नीट, ओघळेल, हासतील कोणी.

नाहीं कशी म्हणूं तुला, घेतें तुझें नांव
परि नको अधरांचा मोडूं सुमडाव.

नाहीं कशी म्हणूं तुला, जरा लपूंछपूं;
परि पायां खडेकांटे लागतात खुपूं.

नाहीं कशी म्हणूं तुला, विडा रे दुपारीं;
परि थोरांच्या समोर घ्यायची सुपारी.
गीत - आरती प्रभू
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर- लता मंगेशकर
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- १८ ऑगस्ट १९५५.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.