A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नाही येथे कुणी कुणाचा

नाही येथे कुणी कुणाचा
स्वार्थ हा एकच न्याय जगाचा!

कुणी न इथला नित्‌ रहिवासी
जो जो आला जाणे त्यासी
स्वार्थ सुटेना परि तयासी
स्वार्थास्तव कुणि इमान विकती
कोणी विकती वाचा!

बळी कुणी स्वार्थाचे होती
जिवंत तेही मरण भोगती
भुतासारखे जगी वागती
शाप बाधतो परि तयांना
तळमळत्या आत्म्यांचा!

सावध सावध सोडव विळखा
दूर सारुनी फसवा बुरखा
पारखून घे अपुला परका
मायावी मयसभा असे ही
रंगमंच कपटाचा!
गीत- शान्‍ता शेळके
संगीत - एन्‌. दत्ता
स्वर - आशा भोसले
चित्रपट- एक दोन तीन
गीत प्रकार - चित्रगीत