A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नकळत सारे घडले

नकळत सारे घडले
मी वळता पाऊल अडले

ती पहिली क्षण ओझरती
परिचयात ओळख नुसती
संभाषण ओठांवरती, लाजण्यात राहुन गेले

नजरेला नजरेमधला
हसताना भाव उमगला
प्रीतीचा डावही पहिला मी क्षणांत मोहुन हरले

सोन्याहुन अति मोलाचे
हे माझे गुपित मनीचे
मनी सुगंध उधळित नाचे, क्षण मलाच का हे नकळे
गीत - रमेश अणावकर
संगीत - दशरथ पुजारी
स्वर- सुमन कल्याणपूर
गीत प्रकार - भावगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.