A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
त्रिभुवनपालक रघुवीर तो

त्रिभुवनपालक रघुवीर तो स्वामी अयोध्येचा
वनवासी तुम्ही आज पोरके, पिता असुन तुमचा

कुणी रजकाने मला निंदिले सहजी गमतीत
अग्‍निशुद्ध मी असुन त्यागिले मजला रानांत
गर्भवती मी केवळ जगले विचार येता तुमचा

तुम्हा मुखीचे हास्य पाहुनी विसरले मी दु:ख
बोल बोबडे ऐकुन वाटे स्वर्गीचे सौख्य
पतीपारख्या स्त्रीला केवळ अधार पुत्रांचा

घ्या बाळांनो शिकून विद्या आणि धनुर्वेद
राज्य पृथ्वीचे जिंका देते आई आशीर्वाद
आशीर्वाद कधी होई न खोटा सती जानकीचा