A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सोनियाचा उंबरा

सोनियाच्या उंबर्‍यात प्रकाशाची उधळण
तुम्हासाठी घेऊन आलो काळजाचं निरूपण
सूर्यदेव आभाळात पाखरांची किलबिल
पाणवठे जागे झाले कांकणांची किणकिण
मानसाच्या जिंदगीची गाथा बाई ग
सोनियाचा उंबरा ही कथा गाई ग

ऐका कथा सांगतो पुण्यवान ओसरीची
समाधानी वेळू मध्ये वाजलेल्या बासरीची
नात्यासंगे हलणार्‍या हिरव्याकंच तोरणाची
तापलेल्या अंगणात पोळलेल्या पावलांची
मानसाच्या जिंदगीची गाथा बाई ग
सोनियाचा उंबरा ही कथा गाई ग
गीत - दासू
संगीत - अशोक पत्की
स्वर- स्वप्‍नील बांदोडकर, माधुरी करमरकर
गीत प्रकार - मालिका गीते
  
टीप -
• शीर्षक गीत, मालिका- सोनियाचा उंबरा, वाहिनी- ई टीव्ही.
निरूपण - व्याख्यान / विवेचन.
वेळू - बांबू.

 

  स्वप्‍नील बांदोडकर, माधुरी करमरकर