A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नाकी डोळी नीट

नाकी डोळी नीट डाव्या गालावर तीट
केसांची बट जिथं खुलायची, पुरषांची जात तिथं फसायची!

रंगमहालाचा हिरवा रंग, खुलवितो प्रीती तो रंग
घ्यावा अनुभव बसून संग
पडली हवा थंडगार, अंगी झोंबतो शहार
दिव्यातली वात जिथं विझायची, पुरषांची जात तिथं फसायची!

कधी रागाचा नकार लटका, गोर्‍या मानेस मोहक झटका
जाईल उडून डोईचा जरीपटका
तिकडं दावुनिया हुल, इकडं पाडेल भूल
लढत गनिमी काव्याची, पुरषांची जात तिथं फसायची!

मुखी विडा रंगला केशरी, श्वासांत मिसळली कस्तुरी
मुखी विडा रंगला केशरी
एक दोन तीन चार, वाजे तुणतुण्याची तार
मुजर्‍याला मान जिथे लवायची, पुरषांची जात तिथं फसायची!
पटका - फेटा / निशाण / ध्वज / ( जरीपटका - मराठ्यांचे निशाण ).