A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नको दूर देशी जाऊ

नको दूर देशी जाऊ सजणा !

हुरहुर करतो माझा जीव
न ये जरा तुजला कीव
सजणा, नको दूर देशी जाऊ सजणा !

समक्ष तुमच्या बसुनी तुम्हांसी
नाही आजवर भाषण केले
सजणा, लाजण्यामध्ये रे दिन गेले
सजणा, नको दूर देशी जाऊ सजणा !

मर्जी मिळाली असता अलीकडे
तुम्ही जाता टाकून वहिले
सजणा, वाटते जिवंत असुनि मी मेले
सजणा, नको दूर देशी जाऊ सजणा !