A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
​नको लागू जीवा सदा

माणसापरी माणूस, राहतो रे वेडा जाणा
आणि होतो छापूनिया, कोरा कागद शहाणा

​नको लागू जीवा सदा मतलबापाठी
हृदयाचं देणघेणं, नाही पोटासाठी

उभे शेतामधी पिकं, ऊन्ह-वारा खात खात
तरसती 'केव्हा जाऊ' देवा, भुकेल्या पोटात

पेटवा रे चुल्हा आता, मांडा ताटवाटी
नको लागू जीवा सदा मतलबापाठी

पाहूनिया रे लोकांचे व्यवहार खोटे-नाटे
तेव्हा बोरीबाभळीच्या आले अंगावर काटे

राखणीच्यासाठी झाले शेताला कुपाटी
नको लागू जीवा सदा मतलबापाठी