नकोस नौके परत फिरूं
नकोस नौके, परत फिरूं ग, नकोस गंगे, ऊर भरूं
श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करूं
जय गंगे, जय भागीरथी
जय जय राम दाशरथी
ही दैवाची उलटी रेघ
माथ्यावरचा ढळवूं मेघ
भाग्य आपुलें अपुल्या हातें अपुल्यापासुन दूर करूं
श्री विष्णूचा हा अवतार
भव-सिंधूच्या करतो पार
तारक त्याला तारुन नेऊं, पदस्पर्शानें सर्व तरुं
जिकडे जातो राम नरेश
सुभग सुभग तो दक्षिण देश
ऐल अयोध्या पडे अहल्या, पैल उगवतिल कल्पतरू
कर्तव्याची धरुनी कांस
राम स्वीकरी हा वनवास
दासच त्याचे आपण, कां मग कर्तव्यासी परत सरूं?
अतिथी असो वा असोत राम
पैल लाविणे अपुलें काम
भलेंबुरें तें राम जाणता, आपण अपुलें काम करूं
गंगे तुज हा मंगल योग
भगीरथ आणि तुझा जलौघ
त्याचा वंशज नेसी तूंही दक्षिण-देशा अमर करूं
पावन गंगा, पावन राम
श्रीरामांचें पावन नाम
त्रिदोषनाशी प्रवास हा प्रभु, नाविक आम्ही नित्य स्मरूं

गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वराविष्कार | - | ∙ सुधीर फडके ∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
राग | - | मिश्र धून |
गीत प्रकार | - | गीतरामायण, राम निरंजन |
टीप - • गीतरामायण. | ||
• प्रथम प्रसारण दिनांक- ५/८/१९५५ | ||
• आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- सुधीर फडके. |
अहल्या | - | ब्रह्मदेवाची मानसकन्या. गौतम ऋषींची पत्नी. त्यांच्या शापाने ती शिळा झाली होती. रामाने सीताविवाहाला जाताना हिचा उद्धार केला. |
कल्पतरू | - | कल्पवृक्ष, इंद्रलोकांतील काल्पनिक वृक्ष. इच्छित वस्तू देतो अशी समजूत आहे. |
कांस | - | कंबर. |
त्रिदोष | - | त्रिधातू - कफ, वात, पित्त. |
दाशरथी | - | राम (दशरथाचा पुत्र). |
भगीरथ | - | सूर्यवंशीय राजा. याने कपिल ऋषींच्या शापानें भस्मसात झालेले आपले पूर्वज उद्धरण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर गंगा आणली. |
सुभग | - | दैवी / सुंदर. |
सिंधु | - | समुद्र. |