A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नामाचिया बळें

नामाचिया बळें न भीऊं सर्वथा । कळिकाळाच्या माथा सोटे मारूं ॥१॥

वैकुंठीचा देव आणूं या कीर्तनीं । विठ्ठल गाउनी नाचो रंगीं ॥२॥

सुखाचा सोहळा करुनी दिवाळी । प्रेमें वनमाळी चित्तीं धरूं ॥३॥

सावता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा । तेणें मुक्तिद्वारा वोळंगती ॥४॥
कळिकाळ - संकट.
वोळगणे - सेवा करणे / शरण येणे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.