नमस्कार घ्यावा अहो
नमस्कार घ्यावा अहो बुद्धदेवा
घुमे प्रार्थना, अंतरी दीप लावा
हरा दु:खभ्रांती
तुम्ही दिव्य शांती
दिला या जगा मंत्र कारुण्य-सेवा
नसे भेद काही
अता खेद नाही
असा लाभला थोर आनंदठेवा
मने शुद्ध जेथे
वसे बुद्ध तेथे
नुरो या जगी कृरता, द्वेष, हेवा
नमो शुद्धरूपा
नमो आत्मदीपा
तमातून या मानवा मार्ग दावा
घुमे प्रार्थना, अंतरी दीप लावा
हरा दु:खभ्रांती
तुम्ही दिव्य शांती
दिला या जगा मंत्र कारुण्य-सेवा
नसे भेद काही
अता खेद नाही
असा लाभला थोर आनंदठेवा
मने शुद्ध जेथे
वसे बुद्ध तेथे
नुरो या जगी कृरता, द्वेष, हेवा
नमो शुद्धरूपा
नमो आत्मदीपा
तमातून या मानवा मार्ग दावा
| गीत | - | मंगेश पाडगांवकर |
| संगीत | - | मधुकर पाठक |
| स्वर | - | सुरेश वाडकर |
| गीत प्रकार | - | प्रार्थना, भीम गीत / बुद्ध गीत |
| तम | - | अंधकार. |
| नुरणे | - | न उरणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












सुरेश वाडकर