नंदाघरी नंदनवन फुलले
नंदाघरी नंदनवन फुलले
बोल बोबडे श्रीरंगाचे गोकुळात घुमले
रिंगण घाली श्याम सावळा
बाळकृष्ण तो रांगत आला
हात धरुनी चालू लागला
पुढे पुढे ग पाऊल पडले
हात चिमुकला उंच नाचवी
छुमछुम वाळा मधुर वाजवी
स्वतः हासुनी जगास हसवी
कौतुक करते गोकुळ सगळे
बोल बोबडे श्रीरंगाचे गोकुळात घुमले
रिंगण घाली श्याम सावळा
बाळकृष्ण तो रांगत आला
हात धरुनी चालू लागला
पुढे पुढे ग पाऊल पडले
हात चिमुकला उंच नाचवी
छुमछुम वाळा मधुर वाजवी
स्वतः हासुनी जगास हसवी
कौतुक करते गोकुळ सगळे
गीत | - | योगेश्वर अभ्यंकर |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत |
या गाण्याबद्दल एक योगायोगाची गोष्ट सांगतो. या गाण्याच्या रेकॉर्डिंगनंतर चार-पाच वर्षांनी सुमन हेमाडी यांचं लग्न श्री. कल्याणपूर यांच्याशी झालं. त्यांच्या मिस्टरांचं नाव आहे 'नंदाजी'. नंदाशेठ म्हणून सगळेच त्यांना ओळखतात. सुमनताई कल्याणपूर त्यांच्या घरात गेल्या व त्यांच्या घराचे नंदनवन फुलले व घराचं गोकुळ झालं. त्यांचा संसार सुखाचा होईल असं भविष्य तर या गीतातून सांगितलं गेलं नसेल? या गीताकडे पाहण्याचा हा नवीन दृष्टिकोन.
सुमनताईंचे सहकार्य म्हणजे माझ्या दृष्टीने माझ्या संगीत कारकीर्दीतला सुवर्णकाळच म्हणावा लागेल.
(संपादित)
अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.