A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नांदायला नांदायला मला बाई

नांदायला नांदायला नांदायला,
मला बाई जायाचं नांदायला

पत्तुर आलं रायाचं
लिवलंय मोठं गमतीचं
लाज मला वाटते सांगायला,
मला बाई जायाचं नांदायला

घुंगराची गाडी येईल ग
बसून त्यामधी जाईल ग
आडाचं पानी शेंदायला,
मला बाई जायाचं नांदायला

नाजूक माझी काया ग
जवळ घेतील राया ग
पिरतीचं गठुडं बांधायला
मला बाई जायाचं नांदायला
गीत - वर्षा माचवे
संगीत - विठ्ठल शिंदे
स्वर- रोशन सातारकर
गीत प्रकार - लावणी
शेंदणे - दोरी लावून, हाताने, विहिरीतून ओढणे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.