A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नसती झाली भेट तुझी ती

नसती झाली भेट तुझी ती
नसते मी हसले
हसता हसता मनही हुरळुनी
जिवलगा नसते मी भुलले

ढलत्या श्यामल तिसर्‍या प्रहरी
जरी केला तू गनिमी हल्ला
नसती झाली नजर फितुरी
नसता पडला किल्ला
लाल किनारी निशाण तव ते
नसते शिरी चढले

शरणागतीने गालावरती
पत्र गुलाबी जरी ते लिहिले
नसती केलीस कैद प्रीती
नसते नाते जडले
निरोप घेता पाऊल माझे
नसते कधी अडले
गीत - पी. सावळाराम
संगीत - वसंत प्रभु
स्वर- लता मंगेशकर
चित्रपट - वादळ
गीत प्रकार - चित्रगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.