A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नष्ट कलिकाल हा

नष्ट कलिकाल हा । दुष्ट शनि राहु बळि ।
दुष्ट संचित छळी । काय नकळे मला ॥

पोर मूर्च्छित पडे । सांवरिल हें घडे ।
पुण्य, परि वांकुडें । पाप वाटे तिला ॥

प्रिय चित्र चुंबिले । हृदयिंही कवळिलें ।
नेत्रिं या पाहिलें । तरि म्हणे निर्मला ॥