A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नटरंग उभा ललकारी

धुमकिट धुमकिट तदानी धुमकिट
नटनागर नट हिमनट पर्वत उभा
उत्तुंग नभा घुमतो मृदुंग
पखवाज देत आवाज झनन झंकार
लेउनी स्‍त्रीरूप भुलवी नटरंग

रसिक होऊ दे दंग चढु दे रंग असा खेळाला
साता जन्मांची देवा पुण्याई लागू दे आज पणाला
हात जोडतो आज आम्हाला दान तुझा दे संग
नटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग

कड्‌कड्‌ कड्‌कड्‌ बोलं ढोलकी हुन्‍नर ही तालाची
छुमछुम छननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची
जमवून असा स्वरसाज मांडतो ईच ईनंती यावं जी
किरपेचं दान द्यावं जी
हे यावं जी, किरपेचं दान द्यावं जी

ईश्वरा जन्म हा दिला प्रसवली कला थोर उपकार
तुज चरणी लागली वरणी कशी ही करणी करू साकार
मांडला नवा संसार आता घरदार तुझा दरबार
पेटला असा अंगार कलेचा ज्वार चढवितो झिंग
नटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग

कड्‌कड्‌ कड्‌कड्‌ बोलं ढोलकी हुन्‍नर ही तालाची
छुमछुम छननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची
जमवून असा स्वरसाज मांडतो ईच ईनंती यावं जी
किरपेचं दान द्यावं जी
हे यावं जी, किरपेचं दान द्यावं जी
ज्वार - भरती (समुद्राच्या पाण्याची वाढ).
वरणी - क्रमाक्रमाने येणारी देवाची विधिवत पूजा करण्याची पाळी.

 

Print option will come back soon
Random song suggestion
  अजय गोगावले, अतुल गोगावले