नात्यास नाव अपुल्या
नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही
सार्याच चांदण्यांची जगतास जाण नाही
ना ताल राग यांच्या बंधात बांधलेला
स्वरमेघ मंजुळाचा बरसे दिशांत दाही
गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा?
मंझिल की जयाची तारांगणात नाही
सार्याच चांदण्यांची जगतास जाण नाही
ना ताल राग यांच्या बंधात बांधलेला
स्वरमेघ मंजुळाचा बरसे दिशांत दाही
गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा?
मंझिल की जयाची तारांगणात नाही
गीत | - | कुसुमाग्रज |
संगीत | - | अजित परब |
स्वर | - | विभावरी आपटे-जोशी |
चित्रपट | - | नटसम्राट |
गीत प्रकार | - | चित्रगीत |