नवा डाव चल मांडायाला
नवा डाव चल मांडायाला मना नव्या गावा
नव्या घरकुलासंगे होईल माझा जन्म नवा
क्षितिज नवे अन् नवे गगनही
नवे बळ मिळे पंखांनाही
पुन्हा नव्याने लागे बहरू स्वप्नांचा ताटवा
एक नवी माथ्यावर छाया
नवलाईची होईल काया
एक नवे माणूस भेटता होईल प्राण नवा
भले-बुरे मग घडू दे काही
भय-शंकांना थारा नाही
मला पुरेसा माझ्या मधला विश्वासाचा ठेवा
नव्या घरकुलासंगे होईल माझा जन्म नवा
क्षितिज नवे अन् नवे गगनही
नवे बळ मिळे पंखांनाही
पुन्हा नव्याने लागे बहरू स्वप्नांचा ताटवा
एक नवी माथ्यावर छाया
नवलाईची होईल काया
एक नवे माणूस भेटता होईल प्राण नवा
भले-बुरे मग घडू दे काही
भय-शंकांना थारा नाही
मला पुरेसा माझ्या मधला विश्वासाचा ठेवा
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | अवधूत गुप्ते |
स्वर | - | सायली पानसे |
चित्रपट | - | मणी मंगळसूत्र |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Print option will come back soon