A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नवीन आज चंद्रमा

नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी
मनी नवीन भावना नवेच स्वप्‍न लोचनी !

दूर बाल्य राहिले, दूर राहिल्या सखी
बोलण्या कुणासवे सूर दाटले मुखी
अननुभूत माधुरी आज गीतगायनी !

अनादि चंद्र अंबरी, अनादि धुंद यामिनी
यौवनात तू नवी मदीय प्रीत-स्वामिनी
घर न प्रीतकुंज हा, बैस ये सुहासिनी

कोण बाई बोलले? वाणी ही प्रियंवदा
या मनात नांदते तुझीच प्रीतसंपदा
कशास वेगळेपणा? जवळ ये विलासिनी !
अननुभूत - नवा.
कुंज - वेलींचा मांडव.
प्रियंवदा - गोड बोलणारी.
मदीय - माझी.
यामिनी - रात्र.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  उषा अत्रे-वाघ, सुधीर फडके