A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नीरक्षीरालिंगनरूपी स्‍नान

नीरक्षीरालिंगनरूपी स्‍नान तुला तें घालोनी
माझ्या अवलोकनवस्‍त्रांनी टाकिन तनु झांकोनी
त्वत्प्रीतीच्या रक्तपणाच्या कुंकुमतिलका लावोनी
तव तनुलतिकायौवनपुष्पें घालिन तुजवर गुंफोनी
चिंतनिं तुझ्या श्वास जाति ते धूपापरि घे मानोनी
मदन पेटवी तनुकर्पूरा ओवाळिन तुजलागोनी
नैवद्यास्तव देइन माझा अधर घेंइ अपुल्या वदनीं
कपटाचरणा केलें त्याची क्षमा करीं गे हरिभगिनी ॥