निघाला मथुरेला यदुनाथ
निघाला मथुरेला यदुनाथ
व्याकूळ झाली माय यशोदा
हृदय करी आकांत
देवकीने वाहियला उदरी
त्यास यशोदा घेई पदरी
वसुदेवाचे बाळ नांदते
नंदाच्या सदनात
हरी नांदतो गोकुळ गावी
त्यात यशोदा गाते ओवी
तृषित देवकी, बाळासाठी
झुरे आतल्या आत
दोन माउल्या, एकच तान्हा
वत्सलतेचा एकच पान्हा
दो हृदयातील कास रक्षिते
बाळाला दिन रात
दोन दिसाचे सरले नाते
हरीस यशोदा निरोप देते
झरती डोळे, रूप सावळे
वाहून जाते त्यात
व्याकूळ झाली माय यशोदा
हृदय करी आकांत
देवकीने वाहियला उदरी
त्यास यशोदा घेई पदरी
वसुदेवाचे बाळ नांदते
नंदाच्या सदनात
हरी नांदतो गोकुळ गावी
त्यात यशोदा गाते ओवी
तृषित देवकी, बाळासाठी
झुरे आतल्या आत
दोन माउल्या, एकच तान्हा
वत्सलतेचा एकच पान्हा
दो हृदयातील कास रक्षिते
बाळाला दिन रात
दोन दिसाचे सरले नाते
हरीस यशोदा निरोप देते
झरती डोळे, रूप सावळे
वाहून जाते त्यात
गीत | - | पु. भा. भावे |
संगीत | - | वसंत पवार |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | साताजन्माचा सोबती |
राग | - | तोडी |
गीत प्रकार | - | चित्रगीत, हे श्यामसुंदर |
कांस | - | कंबर / कासोटा, ओटी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.