निळ्या नभांतून नील चांदणे
निळ्या नभांतून नील चांदणे निथळे मार्गावरी
स्वप्नरथातुन तुज भेटाया आले तव मंदिरी
पापण्यांच्या पडद्यामधुनी
तुझीच दिसते मूर्ति नयनी
मंद मंद या वार्यावरुनी
स्वरवेलीची गोड ऐकु ये मादक तव बासरी
श्यामल कांती तुझी माधवा
स्वर्गसुखाचा ओठी पावा
अर्थ त्यांतला मजला ठावा
वर्षव देवा या राधेवर अमृत प्रीती-सरी
स्वप्नरथातुन तुज भेटाया आले तव मंदिरी
पापण्यांच्या पडद्यामधुनी
तुझीच दिसते मूर्ति नयनी
मंद मंद या वार्यावरुनी
स्वरवेलीची गोड ऐकु ये मादक तव बासरी
श्यामल कांती तुझी माधवा
स्वर्गसुखाचा ओठी पावा
अर्थ त्यांतला मजला ठावा
वर्षव देवा या राधेवर अमृत प्रीती-सरी
गीत | - | मधुकर जोशी |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | माणिक वर्मा |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, हे श्यामसुंदर, कल्पनेचा कुंचला, भावगीत |
पावा | - | बासरी, वेणु. |