A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सुख पाहतां जवापाडें

सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वताएवढें ॥१॥

धरीं धरीं आठवण । मानीं संताचें वचन ॥२॥

नेलें रात्रीनें तें अर्धें । बाळपण जराव्याधें ॥३॥

तुका ह्मणे पुढा । घाणा जुंती जसी मूढा ॥४॥
जरा - वृद्धत्‍व. (अजर- जरारहित, वार्धक्यरहित)
पाडे - प्रमाणे.
भावार्थ-

  • या संसारामध्ये जवाएवढे थोडेसुद्धा सुख मिळत नाही. पण दु:ख मात्र पर्वताएवढे मोठे आढळते.
  • या गोष्टीची आठवण ठेव. संतांच्या वचनांतील उपदेशाप्रमाणे वागत जा.
  • आपल्याला वाटते असे आयुष्य मोठे नाही. आपले अर्धे आयुष्य रात्री झोप काढण्यातच निघून जाते. न समजण्यार्‍या बालपणात कितीतरी दिवस जातात. त्यात रोगराईमुळे आजारपण आणि याशिवाय म्हातारपण यात जाते.
  • तुकाराम महाराज म्हणतात, हे मूर्ख मनुष्या, सावध हो. संत वचने मान. नाहीतर पुढील जन्‍मीही तू असाच संसाररूपी घाण्याला जुंपला जाशील.

गो. वि. नामजोशी
संत तुकारामाची सार्थ अभंगवाणी
सौजन्य- सुलभ प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.