A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
निरोप द्यावा बाळा आतां

निरोप द्यावा बाळा आतां । टाकुनि जाते माता ॥

घटकेचा संसार संपला, लटका ठावठिकाणा ।
वनदेवींनो, पदरीं घ्या हा माझा राजसराणा ॥

अनाथ दुबळा देह पडे हा, आई नाहीं त्याला ।
काळ्या रातीं जित्या फुलांचा खडा पहारा ठेवा ॥

भुतें जागतां उठतां दचकुनि हृदयींचा हा ठेवा ।
फुलत्या फुलवंतीची यावर मायापांखर घाला ॥