निरोप तुमचा आम्ही घेतो
निरोप तुमचा आम्ही घेतो
तुमच्या हाती बंदुक देतो
जखमी बांधव तुम्हा सांगतो
निरोप तुमचा आम्ही घेतो
ऊठ जवाना ऊठ आता तू
अरिसैन्याला ठोकत जा तू
पुढचे पाऊल पुढे टाक तू
श्वास अडखळे तरी सांगतो
"सांभाळावे स्वातंत्र्याला"
भारतमाता वदली मजला
त्याच्यासाठी प्राण अर्पिला
आम्ही जातो, कंठ दाटतो
रक्षण करी तू स्वातंत्र्याचे
उन्नत राहो निशाण अमुचे
हीच मनीषा शेवटची रे
वैभशाली भारत बघतो
तुमच्या हाती बंदुक देतो
जखमी बांधव तुम्हा सांगतो
निरोप तुमचा आम्ही घेतो
ऊठ जवाना ऊठ आता तू
अरिसैन्याला ठोकत जा तू
पुढचे पाऊल पुढे टाक तू
श्वास अडखळे तरी सांगतो
"सांभाळावे स्वातंत्र्याला"
भारतमाता वदली मजला
त्याच्यासाठी प्राण अर्पिला
आम्ही जातो, कंठ दाटतो
रक्षण करी तू स्वातंत्र्याचे
उन्नत राहो निशाण अमुचे
हीच मनीषा शेवटची रे
वैभशाली भारत बघतो
गीत | - | योगेश्वर अभ्यंकर |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | अरुण दाते |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
अरि | - | शत्रु. |