A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नित्य वाचे प्रभुनाम

नित्य वाचे प्रभुनाम गाऊ
पांडुरंगी सदा लीन राहू

हा फेर जनन मरणाचा
चुकविताही ना चुकण्याचा
सुखेदु:खे समानच साहू

कोणी ब्राह्मण कोणी महार
करू नका असा अविचार
एकमेकां म्हणू भाऊ-भाऊ

सुख दारा घर सन्मान
नको वृथाच हा अभिमान
प्रभु पायी तनू-ध्यान वाहू

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.