A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नुकतें होतें नजरेंत तुझ्या

नुकतें होतें नजरेंत तुझ्या
दिसूं लागलें अवखळ पाणी;
नुकतीं होतीं तुझ्या जिभेवर
नांचु लागलीं अल्लड गाणीं;

नुकते होते सुरू जाहले
लाजेचे पदराशी चाळे;
नुकते नकळत वितळत होते
भाव निरंकुश साधेभोळे;

नुकतें नुकतें होतिस शिकलिस
ओठ दाबण्या दांतांखाली !
नुकत्या नुकत्या मीही होतों
जुळवित पहिल्यावहिल्या ओळी !

पहिल्यावहिल्या त्या ओळींतिल
कुणासही नच कांहीं रुचतें;
आठवतां पण त्या माझें मन
मध्येंच झुरतें; मध्येंच फुलतें!

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.