A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ओंजळीत माझ्या माझे उसासे

ओंजळीत माझ्या माझे उसासे
आणि भोवताली आभाळ भासे !

कंठात हुंकार परतून गेले
तळव्यात अश्रू किती वेचलेले
कसे मीच माझे अवसान होते
स्वप्‍नास माझ्या माझे दिलासे
आणि भोवताली आभाळ भासे !

दिशा थांबलेल्या आणि बंद वाटा
जगणेच आहे इथे साचलेले
किती प्रश्न भवती आणि मन रिकामे
कशाचे करावे स्वत:शी खुलासे
आणि भोवताली आभाळ भासे !

 

Random song suggestion
This 👇 player works on all android and iOS devices also
  साधना सरगम