ऊन पाऊस
ऋतु सोबतीने सारी जुनी झाडे नवी होता
पानेफुले सांगतात ऊनपावसाची कथा
सुख सोसावे उन्हाचे, दु:ख पावसाळी गावे
अशा सोसण्याला द्यावी किती नवी-जुनी नावे
अशा जगण्याची सय किती व्हावी होता होता
ऊनपावसाची कथा, ऊनपावसाची कथा
जसा वारा हेलावून सांगे वादळाची व्यथा
ऊनपावसाची कथा, ऊनपावसाची कथा
पानेफुले सांगतात ऊनपावसाची कथा
सुख सोसावे उन्हाचे, दु:ख पावसाळी गावे
अशा सोसण्याला द्यावी किती नवी-जुनी नावे
अशा जगण्याची सय किती व्हावी होता होता
ऊनपावसाची कथा, ऊनपावसाची कथा
जसा वारा हेलावून सांगे वादळाची व्यथा
ऊनपावसाची कथा, ऊनपावसाची कथा
गीत | - | |
संगीत | - | नरेंद्र भिडे |
स्वर | - | महालक्ष्मी अय्यर |
गीत प्रकार | - | मालिका गीत |
टीप - • शीर्षक गीत, मालिका- ऊन पाऊस, वाहिनी- झी मराठी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.