A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ऊंस डोंगा परि रस नोहे

ऊंस डोंगा परि रस नोहे डोंगा ।
काय भुललासी वरलीया सोंगा ॥१॥

कमान डोंगी परि तीर नोहे डोंगा ।
काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥

नदी डोंगी परि जळ नोहे डोंगे ।
काय भुललासी वरलीया ढंगे ॥ ३ ॥

चोखा डोंगा परि भाव नोहे डोंगा ।
काय भुललासी वरलीये सोंगा ॥४॥
डोंगा - वाकडा.
मूळ रचना

ऊंस डोंगा परि रस नोहे डोंगा ।
काय भुललासी वरलीया रंगा ॥१॥

कमान डोंगी परि तीर नोहे डोंगा ।
काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥

नदी डोंगी परि जळ नोहे डोंगे ।
काय भुललासी वरलीया रंगा ॥ ३ ॥

चोखा डोंगा परि भाव नोहे डोंगा ।
काय भुललासी वरलीया रंगा ॥४॥

  संपूर्ण कविता / मूळ रचना

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.