पदरावरती जरतारीचा मोर
पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा
आई मला नेसव शालू नवा
बांधिला सैलसर बुचडा मानेवरी
माळला सुरंगी गजरा ग त्यावरी
मोकळ्या बटा या रुळती भाळावरी
केसावरती लहर उठविली फिरवुन हळू कंगवा
डोळ्यांत रेखिले काजळ मऊ झोंबते
कानांत घातले लोलक मी लोंबते
फिरफिरुनी माझी मी ऐन्याशी थांबते
गोर्या भाळी कोरून ल्याले पुनवेचा चांदवा
मज पहावयास येतील ग कोण ते?
पाहिले काल पण नाव न मी जाणते
परि गुणांस त्यांच्या नगरी वाखाणते
नुसती येता सई, उरी या घुमतो ग पारवा
आई मला नेसव शालू नवा
बांधिला सैलसर बुचडा मानेवरी
माळला सुरंगी गजरा ग त्यावरी
मोकळ्या बटा या रुळती भाळावरी
केसावरती लहर उठविली फिरवुन हळू कंगवा
डोळ्यांत रेखिले काजळ मऊ झोंबते
कानांत घातले लोलक मी लोंबते
फिरफिरुनी माझी मी ऐन्याशी थांबते
गोर्या भाळी कोरून ल्याले पुनवेचा चांदवा
मज पहावयास येतील ग कोण ते?
पाहिले काल पण नाव न मी जाणते
परि गुणांस त्यांच्या नगरी वाखाणते
नुसती येता सई, उरी या घुमतो ग पारवा
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | वसंत पवार |
स्वर | - | सुलोचना चव्हाण |
चित्रपट | - | मल्हारी मार्तंड |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी |
पारवा | - | कबुतराची एक जात किंवा त्याच्या रंगाचा. |
वाखाणणे | - | स्तुती करणे. |
सई | - | आठवण. |
सुरंगी | - | एक प्रकारचे सुगंधी फूल / एक प्रकारच्या अत्तराचे नाव. |