पहा रे परमेशाची लीला
पहा रे परमेशाची लीला
जये उभविली नवलाईची जगन्नाट्यशाला
वरती शोभे विशाल अंबर
बिनखांबांचा घुमट मनोहर
खाली हिरवी हिरवी चादर- सुंदर वनमाला
या गगनाच्या नील छतावर
चमकदार चंद्राचे झुंबर
कोटिकोटि तारका चमकती जणू दीपमाला
जये उभविली नवलाईची जगन्नाट्यशाला
वरती शोभे विशाल अंबर
बिनखांबांचा घुमट मनोहर
खाली हिरवी हिरवी चादर- सुंदर वनमाला
या गगनाच्या नील छतावर
चमकदार चंद्राचे झुंबर
कोटिकोटि तारका चमकती जणू दीपमाला
गीत | - | विद्याधर गोखले |
संगीत | - | पं. राम मराठे, प्रभाकर भालेकर |
स्वर | - | पं. राम देशपांडे |
नाटक | - | मदनाची मंजिरी |
गीत प्रकार | - | नमन नटवरा, भक्तीगीत |
Print option will come back soon